बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील कलाकार सध्या दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहे. दिया मिर्झानंतर अनुष्का शर्मा ‘एनएच १०’ या चित्रपटाद्वारे निर्मितीमध्ये क्षेत्रात येतेयं. तर दुसरीकडे, सलमान खान, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर यांच्याप्रमाणे दीपिका पदुकोणही आता गाणे गाण्यास सज्ज झाली आहे. आगामी ‘तमाशा’ चित्रपटातील एका गाण्यासाठी ती आवाज देणार आहे. deepikaarrahman
यापूर्वी, आलियाने ‘हायवे’ चित्रपटात ए.आर.रेहमानच्या संगीत छत्रछायेखाली गाणे गायले होते. आता दीपिकाही तिच्याच पाऊलावर पाऊल ठेवताना दिसेल. ‘हायवे’, ‘रॉकस्टार’ आणि ‘जब वी मेट’सारखे यशस्वी चित्रपट देणारा इम्तियाज अली हा ‘तमाशा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.