बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच मोठ्या पडद्यावर बॅडमिंटनपटू सायना नेहवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ली हिंदी चित्रपटसृष्टीत खेळाडूंवर चित्रपट बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट प्रख्यात धावपटू मिल्खा सिंग यांच्या जिवनावर आधारित होता. तर एक प्रसिध्द दिग्दर्शक ‘मेरीकोम’ या महिल्या मुष्टीयोध्दाच्या जिवनावर चित्रपट बनवत आहेत. या सर्वांबरोबर आणखी एका खेळाडूचे नाव लवकरच जोडले जाण्याची शक्यता आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मोठ्या पडद्यावर प्रसिध्द बॅडमिंटनपटू सायना नेहवालची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारताना दिसू शकते. सूत्रांनी दिलेल्या मिहितीनुसार सायना नेहवालच्या जिवनावर आधारित या चित्रपटातील मुख्य भूमिका दीपिका पदुकोणने साकारावी अशी महेश भट यांची इच्छा आहे. असे असले तरी, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण हे एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होते, तर दीपिकालासुध्दा बॅडमिंटन खेळण्यामध्ये रस होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 5, 2014 7:15 am