News Flash

‘राजी’ दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दीपिका?

श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांच्या 'चालबाज' या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात यावा इच्छा दीपिकाने यापूर्वी व्यक्त केली होती.

अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शिका मेघना गुलजार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने काही वेळासाठी ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या. नोव्हेंबरमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याने दीपिका इतक्यात कोणता चित्रपट स्विकारणार नाही असा अंदाज होता. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटाची साइनिंग अमाऊंटसुद्धा (चित्रपट स्विकारताना घेतलेली ठराविक रक्कम) दीपिकाने परत केली होती. मात्र आता एका खास चित्रपटासाठी ‘राजी’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि दीपिका यांच्यात भेटीगाठी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मेघना गुलजार यांचा ‘राजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक- समीक्षकांकडूनही दाद मिळाली. आता त्यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका झळकणार असं म्हटलं जात आहे. ‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि मेघना यांच्यात आगामी प्रोजेक्टसंदर्भात चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कोणता आहे आणि त्यामध्ये इतर कोणकोणते कलाकार काम करणार आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांच्या ‘चालबाज’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात यावा इच्छा दीपिकाने यापूर्वी व्यक्त केली होती. तेव्हा मेघना गुलजार हा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार का आणि दीपिका यामध्ये दुहेरी भूमिका साकारणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 11:25 am

Web Title: deepika padukone to team up with raazi director meghna gulzar
Next Stories
1 ‘मेड इन चायना’मध्ये राजकुमार रावसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री
2 Video : ‘या’ गाण्यातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत झळकणार स्पृहाचा पती
3 Happy Birthday Priya : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?
Just Now!
X