News Flash

दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रचारासाठी विन डिझेल भारतात येतोय!

दीपिका म्हणते आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहतोय

विन डिझेल आणि दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिचा पहिला वहिला हॉलिवूडपट सर्वप्रथम भारतामध्ये प्रदर्शित करण्याचे पक्के झाल्यानंतर आता दीपिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी चक्क हॉलिवूड स्टार विन डिझेल भारतामध्ये येणार आहे. विन डिझेल दोन दिवसांसाठी भारतामध्ये येणार असल्याची माहिती दीपिका पदुकोणने दिली आहे. १२ जानेवारीला विन भारतात दाखल होईल, असे दीपिकाने सांगितले आहे. दीपिकाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन विनला एक संदेश दिला आहे. भारत तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगत १२ आणि १३ जानेवारीला भेटू असे ट्विट दीपिकाने केले आहे.

हॉलिवूड अभिनेता विन डिझेल आणि दीपिकाने ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रिकरणादरम्याने अनेकदा चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट दिली आहे. दीपिका पदुकोणच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्याची कबूली देखील विन डिजेल याने यापूर्वी दिली होती. त्यानंतर ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातील ही जोडी आता साक्षात भारतीय चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने यापूर्वी दिली होती. जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रपगृहात दाखल होणार आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होणार आहे.

‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’  या  हॉलिवूडपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चांगलीच चर्चेत आहे.  २०१६ च्या वर्षाअखेर म्हजेच ३१ डिसेंबरला ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले होते.  संजल लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटात देखील दीपिका मह्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत अभिनेता रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 6:10 pm

Web Title: deepika padukone vin diesel xxx return of the xander cage india
Next Stories
1 अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची ‘चाहूल’
2 ..यामुळे जॉन रात्री झोपूच शकत नव्हता
3 कतरिनावर सलमानचाच वरदहस्त
Just Now!
X