अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘पद्मावती’ सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. एरवीही इतर अनेक कारणांमुळे ती सतत प्रकाशझोतात असते. आता हेच पाहा ना यावर्षी दीपिकाने पुन्हा एकदा ‘सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावण्याचे तिचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

https://www.instagram.com/p/BWeWfU7B4wf/

आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री सध्या ‘पद्मावती’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात ती राणी ‘पद्मावती’च्या भूमिकेत झळकणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमातील अनुभवाविषयी सांगत दीपिकाने सर्वात आव्हानात्मक दृश्याचाही उल्लेख केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमातील ‘जौहर’च्या दृश्याचा दीपिकाच्या मनावर खूपच परिणाम झाला होता. दीपिकासोबत या सिनेमात शाहीद कपूर आणि रणवीर सिंगही झळकणार आहेत.

https://www.instagram.com/p/BWRMGS9h5AW/

https://www.instagram.com/p/BV9y7_vBmvI/

दीपिकाने २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण  केले. पहिल्याच सिनेमात शाहरूख खानसोबत काम करायला मिळणे हेच तिच्यासाठी स्वप्नपूर्ती होती. त्यानंतर दीपिकाने अनेक हिट सिनेमे दिले. सध्या ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा दबदबा कायम राखत आहेत. विन डिझेलसोबत दीपिकाने ‘ट्रिपल एक्स- रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमात काम केल्यानंतर ती पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे. तिने नैराश्याचा सामना करणाऱ्यांसाठी ‘लिव्ह लव्ह लाफ’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे.

https://www.instagram.com/p/BVFt6pUB4Ia/