News Flash

दीपिकाचा हा फोटो पाहून हुरळून जाऊ नका

बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'पद्मावती'चे शूटींग काही दिवसांपूर्वीच सुरु झाले.

'पद्मावती' ही मुख्य भूमिका दीपिका पदुकोण साकारत असून तिचा चित्रपटातील लूक व्हायरल झाला होता.

चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरून चर्चेत राहिलेला दिग्दर्शक संजय लीला भन्सालीचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘पद्मावती’चे शूटींग काही दिवसांपूर्वीच सुरु झाले. या चित्रपटात ‘पद्मावती’ ही मुख्य भूमिका दीपिका पदुकोण साकारत असून तिचा चित्रपटातील लूक व्हायरल झाला होता. मात्र, हा लीक झालेला लूक खोटा असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक श्रुती महाजनने तिच्या फेसबुक अकाउन्टवर एक पोस्ट शेअर करत तो फोटो खोटा असल्याचे सांगितले. व्हायरल झालेला फोटो श्रुतीच्या ख-या अकाउन्टरून नव्हे तर एका अनधिकृत अकाउन्टरून टाकण्यात आल्याचे तिने सांगितले.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मेवाडच्या राणीची म्हणजेच पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटातील दीपिकाच्या लूकचे एक रेखाचित्र फेसबुकवर व्हायरल झाले होते. यात दीपिकाचे एक स्केच काढण्यात आले होते. चित्रपटात दीपिकाचा हाच लूक असणार असल्याचे म्हटले जात होते. पण, श्रुतीच्या एका पोस्टने दीपिकाच्या लूकविषयी आता पुन्हा एकदा सर्वांची उत्सुकता वाढविली आहे. दरम्यान, आता ‘पद्मावती’चे चित्रीकरण मुंबईतील वांद्रे परिसरातील मेहबूब स्टुडिओत सुरु आहे.

‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता चांगलेच तयारीला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत जास्तच काळजी घेत आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये १३ ते १४ व्या शतकातील चित्रण साकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित येत आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहिद कपीर यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर फार मेहेनत घेतल्याचे कळत आहे. २०१७ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:48 pm

Web Title: deepika padukones first look from padmavati is a fake says casting director
Next Stories
1 ‘आम्ही दोघे राजाराणी’तून अनुभवा निखळ मनोरंजनाची मेजवानी
2 मुलगी आराध्याच्या वाढदिवशी अभिषेकला मिळाले एक कोटींचे गिफ्ट!
3 अजय मला वेळोवेळी सुंदरतेची जाणीव करुन देतो- काजोल
Just Now!
X