17 July 2019

News Flash

Video : दीपिकाच्या पुतळ्यावर खिळल्या रणवीरच्या नजरा!

लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये दीपिकाचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे

दीपिका , रणवीर

२००७ साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. दिपिकाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दीपिकाने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. तिच्या उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे आज तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या याच लोकप्रियतेमुळे लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये तिचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीरने नुकतीच या संग्रहालयाला भेट दिली असून दीपिकाचा पुतळा पाहुन चक्क रणवीरच्या नजरा या पुतळ्यावर खिळल्याचं पाहायला मिळालं.

दीपिका म्हणजे सौंदर्य आणि अभिनय यांचा सुंदर मिलाप. तिचं हेच सौंदर्य मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पुतळ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा पुतळा हुबेहूब दीपिकाप्रमाणे भासत असल्यामुळे रणवीर या पुतळ्याकडे काही क्षण पाहतच बसला. रणवीर पुतळ्याकडे पाहत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

#ranveersingh looks amazed to see #deepikapadukone wax statue

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये अलीकडेच दीपिकाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी दीपिकासोबत रणवीर आणि दीपिकाचे आई-वडील उपस्थित होते. यावेळी हा पुतळा पाहुन मी हा घरी घेऊन जाऊ का असा मिश्कील प्रश्न रणवीरने विचारल्याचं पाहायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

Unveiling of #deepikapadukone wax statue at #madametussauds in London

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, दीपिकाने २०१६ मध्ये आयफा अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये जो ड्रेस घातला होता. तोच ड्रेस या पुतळ्याला घातला आहे. हा पुतळा पाहुन दीपिकाच्या आई, बहिण यांनीही सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First Published on March 15, 2019 3:53 pm

Web Title: deepika padukones madame tussauds statue ranveer singh shock