28 September 2020

News Flash

अमेरिकेतील ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळतो दीपिका पदुकोणच्या नावाचा डोसा!

या डोसाची किंमत ऐकून व्हाल थक्क

दीपिका पदुकोण

‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. अभिनयकौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर दीपिकाने तमाम चाहत्यांना वेड लावलं. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये झळकलेल्या या अभिनेत्री क्रेझ भारतासोबतच विदेशातही आहे. विशेष म्हणजे तिची लोकप्रियता अफाट असून अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये चक्क तिच्या नावाचा डोसा मिळत असल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेतील टेक्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये दीपिका पदुकोणच्या नावाने डोसा मिळत असल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच रणवीरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डचा फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे दीपिका पदुकोण डोसा खाण्यासाठी ग्राहकांना तब्बल १० डॉलर्स मोजावे लागणार आहेत.

हा डोसा टेक्सासमधील एका इंडियन रेस्टरंटमध्ये मिळत असून रणवीरप्रमाचे दीपिकाच्या एका फॅनपेजवरही या रेस्टॉरंटचं मेन्युकार्ड शेअर करण्यायत आलं आहे. ‘दीपिका पदुकोण’ हा डोसा तब्बल १० डॉलर्स म्हणजे जवळपास ७०० रुपयांचा असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान,  दीपिकाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. उत्तम अभिनयाच्या जोरावर दीपिकाने केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडही गाजवलं आहे. त्यामुळेच तिच्या लोकप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या लॉकडाउन असल्यामुळे दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे हा लॉकडाउन संपल्यानंतर ती तिच्या आगामी ‘इंटर्न’ या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘इंटर्न’ या हॉलिवूडपटाचा रिमेक असून शगून बात्रा त्याचं दिग्दर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 8:50 am

Web Title: deepika special dish famous hotel in america ssj 93
Next Stories
1 “तुम्ही कर्ज चित्रपटाप्रमाणे पुर्नजन्म घ्या”; ऋषी कपूर यांच्या आठवणीने लता मंगेशकर व्याकूळ
2 “भारतीय माध्यमं किम जोंग उन यांच्या मागे का आहेत?”; अभिनेत्याला पडला प्रश्न
3 अमृता फडणवीस यांचं करोना योद्धांसाठी नवीन गाणं, ‘तू मंदिर तू शिवाला’
Just Now!
X