29 September 2020

News Flash

दीपिकाची बहिणच तिची सर्वात मोठी टीकाकार

संजय लीला भन्सालीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गोलिया की राललीला: राम लीला' करिता प्रशंसा मिळवणारी अभिनेत्री दीपिका स्वतःच्या बहिणीच्या टीकेला सामोरे जात आहे.

| November 25, 2013 02:41 am

संजय लीला भन्सालीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोलियो की रासलीला: राम लीला’ करिता प्रशंसा मिळवणारी अभिनेत्री दीपिका स्वतःच्या बहिणीच्या टीकेला सामोरे जात आहे. तिची छोटी बहिण अनीशा तिची सर्वात मोठी टीकाकार असल्याचे दीपिका म्हणाली.
दीपिका म्हणाली की, अनीषा तिच्या विचारांच्याबाबतीत ईमानदार आहे. ती माझी सर्वात मोठी टीकाकार असून, तिच्या मनात जे आहे तेच ती बोलते. मग ती माझ्याबाबतली टीका असली तरीसुद्धी ती सत्य बोलते. मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही कारण ती ईमानदार आहे आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा ती करते. राम लीलाच्या बाबतीत बोलायचं तर अनीषाला हा चित्रपट खूप आवडला.
यशाच्या शिखरावर असलेली २७ वर्षीय दीपिका विवाहबंधनात अडकण्यासाठी तयार नसल्याचेही ती म्हणाली. तिच्या करियरचा आणि लग्नाचा काहीच संबध नसून, सध्या ती अशीच खूष असल्याचे तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2013 2:41 am

Web Title: deepikas little sister is her big criticiser
Next Stories
1 पहिला मराठी सुपरहिरो ‘बाजी’च्या भूमिकेत श्रेयस तळपदे
2 पुढील वर्षांपासून गोव्यात आशियाई चित्रपट महोत्सव
3 अनुष्काबद्दल मला तक्रार नाही- राज कुमार
Just Now!
X