News Flash

‘केबीसी’चे सप्तकोटी विजेते जाहीर

'कौन बनेगा करोडपती'च्या या पर्वात सात कोटी रुपयांची धनराशी जिंकण्याचा मान नरूला बंधूंना मिळाला आहे.

| September 22, 2014 12:34 pm

 ‘कौन बनेगा करोडपती’ला या पर्वामध्ये ‘सप्तकोटी’चा महाजॅकपॉट जिंकणारे विजेते सापडले आहेत. दिल्लीच्या अचिन आणि सार्थक नरूला या दोन भावंडांनी सर्वाधिक रक्कम जिंकून ‘केबीसी’च्या इतिहासात एक अविस्मरणीय क्षण नोंदवला आहे. ‘हा क्षण अत्यानंदाचा क्षण आहे. ‘केबीसी’च्या शुभारंभापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक सिद्धार्थ बासू यांनी दिली आहे.
अचिनच्या आईला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. आईच्या उपचारांसाठी त्यांना पैशांची गरज आहेच. त्यात वडिलांना व्यवसायात मोठा फटका बसल्यामुळे त्यांचे राहते घरही विकावे लागले होते. या पैशातून त्यांना आईचे उपचार करायचे आहे आणि घरही मिळवायचे आहे. अचिन आणि सार्थक यांनी ज्या हुशारीने झटपट उत्तरे देत ‘सप्तकोटी’ जिंकले ते पाहिल्यानंतर ‘केबीसी’चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी या दोघांच्याही बुद्धिमत्तेचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2014 12:34 pm

Web Title: delhi brothers win kbcs maha jackpot worth rs 7 cr
टॅग : Kaun Banega Crorepati
Next Stories
1 पाहाः अक्षय कुमारच्या ‘द शौकीन’चे मोशन पोस्टर
2 ‘टपाल’ ला बॉलिवडूकरांची पसंती
3 शशी कपूर रुग्णालयात दाखल
Just Now!
X