03 June 2020

News Flash

‘वझीर’ पाहण्यासाठी अरविंद केजरीवाल आणि सिसोदियांची उपस्थिती

चित्रपटाची टीम आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 'वझीर'चा विशेष खेळ आयोजित केला होता

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ‘वझीर’ चित्रपट पाहण्यासाठी मुंबईतील एका चित्रपटगृहात हजेरी लावली होती. यावेळी फरहान खान आणि अदिती राव हैदरी यांच्यासह वझीरचे निर्माते विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक बिजॉय नांबियारदेखील उपस्थित होते. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाची टीम आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘वझीर’चा विशेष खेळ आयोजित केला होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर ‘आप’चे नेते मनिष सिसोदिया आणि कुमार विश्वास यांनीदेखील चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार यांनी ट्रेलरमधून तरी फरहान आणि बिग बी यांच्या भूमिका आणि वावर याविषयी एक प्रकारची गूढता जोडली आहे असे वाटतेय. ८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच हे गूढ उकलणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 11:36 am

Web Title: delhi chief minister arvind kejriwal watches wazir with star cast
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 अवघ्या तीन दिवसांत दहा कोटींचा गल्ला..
2 पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना बिग बींची श्रद्धांजली; ट्विटरवर तिरंग्याचा प्रोफाईट फोटो
3 किसींग सीनः रणबीरसोबतच्या ‘त्या’ छायाचित्रावर कतरिनाची प्रतिक्रिया..
Just Now!
X