26 January 2021

News Flash

ऐतिहासिक… दिल्ली क्राईमची जागतिक स्तरावर दखल; पटकावला एमी पुरस्कार

एका भारतीय वेब सीरिजनं कोरलं आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव

यंदाच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर भारतीय कलाकारांनी छाप सोडली आहे. ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार पटकावला आहे. या विभागात ‘बेटर कॉल सोल’, ‘द किलिंग ईव्ह’, ‘द क्राऊन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ यांसारख्या अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये स्पर्धा होती. परंतु या स्पर्धेत ‘दिल्ली क्राईम’नं बाजी मारत विजेता पद पटकावलं आहे.

एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणं अनेक कलाकारांचं स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकारांचं जगभरातून कौतूक केलं जातं. या पार्श्वभूमीवर एका भारतील वेब सीरिजनं एमी पुरस्कार पटकावणं नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक रिची मेहता यांनी ‘दिल्ली क्राईम’ची निर्मिती केली होती. अभिनेत्री शेफाली शाह हिने या सीरिजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ही सीरिज २०१२ साली झालेल्या एका गँग रेपवर आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 11:41 am

Web Title: delhi crime won international emmy awards 2020 mppg 94
Next Stories
1 ‘माझी किडनी फेल होत होती, जीवाला धोका होता’- राणा डग्गुबती
2 ‘माझे फोटो डिलिट करा’; ‘दंगल गर्ल’ झायराची चाहत्यांना विनंती
3 तेव्हा सलीम खान यांनी भोगली सलमानची शिक्षा; कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
Just Now!
X