News Flash

आधी ड्रग्सचा ओव्हरडोज, मग बलात्कार गायिकेने सांगितली ‘त्या’ रात्रीची घटना

पाहा व्हिडीओ

(photo credit- instagram @ddlovato)

अमेरिकेची लोकप्रिय गायिका डेमी लोवाटोची डॉक्युमेंट्री लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘Demi Lovato: Dancing with the Devil’ असे या डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. या डॉक्युमेंट्रीत डेमीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डेमीने तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्यात भयानक गोष्टींचा खुलासा या डॉक्युमेंट्रीत केला आहे.

डेमीचे दोनदा शारीरिक शोषण झाले आहे. एकदा लहाण असताना तर दुसऱ्यांदा तिला ड्रग्स देऊन तिचा बलात्कार केला होता. या दोन्ही घटनांविषयी या डॉक्युमेंट्रीत तिने उघडपणे सांगितले आहे. ही घटना डेमी १५ वर्षांची होती तेव्हाची आहे. “त्यावेळी मी लहाण होती, तेव्हा माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतू मी शारीरिक संबंध करण्यास तयार नाही असे मी सांगितले होते.” असे डेमी म्हणाली.

त्यानंतर डेमीसोबत ही घटना पुन्हा कधी झाली याबद्दल तिने सांगितले आहे. ती म्हणाली, “दुसऱ्यांदा ही घटना २०१८ मध्ये घडली होती. तेव्हा मी मृतावस्थेत होती. मला फक्त जास्त प्रमाणात ड्रग्स दिले गेले नव्हते. तर माझा फायदा घेण्याचाही प्रयत्न केला गेला. जेव्हा मी बेशुद्धा पडली होती तेव्हा माझ्या अंगावर कपडे नव्हते. त्याने माझा फायदा उचलला होता. मी एकाप्रकारे मृतच होती. माझे डोळे रूग्णालयात उघडले, मला तिथे प्रश्न विचारण्यात आला की हे सगळं माझ्या इच्छेनुसार झालं का? तेव्हा मी हो असे उत्तर दिले. परंतु नंतर मला समजले की मला ड्रग्जसचा ओव्हरडोज देण्यात आला होता, ज्यामुळे मी स्वत: निर्णय घेण्याची क्षमता गमावली होती.”

डेमीच्या मित्रानेही या घटनेची आठवण करताना सांगितले की, “डेमीला हेरोइनचा जास्त डोस देण्यात आला होता. तिला मरण्यासाठी तिथे सोडून गेले होते.”

अमेरिकन गायिका डेमी लोवाटोची डॉक्युमेंट्री ‘Demi Lovato: Dancing with the Devil’ मध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले आहे. ही डॉक्युमेंट्री २३ मार्च रोजी युट्युबवर पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 6:43 pm

Web Title: demi lovato sexual assault shocking incident american singer dcp 98
Next Stories
1 अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ ‘राम सेतू’ची करणार सहनिर्मिती
2 माझा मुलगा अडल्ट झालाय; माधुरीने वाढदिवसाला केली खास पोस्ट
3 नचिकेत आणि केतकर कुटुंबीय म्हणत आहेत ‘डोन्ट रष’
Just Now!
X