News Flash

“ड्रिप्रेशनलाच पाठवा ड्रिप्रेशनमध्ये”; धर्मेंद्र यांचा मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल

नैराश्यातून बाहेर कसे याल?; धर्मेंद्र यांनी दिल्या खास टिप्स

अ‍ॅक्शन हिरो धर्मेंद्र सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहेत. परंतु सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रीय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते ड्रिप्रेशनच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. घाबरु नका ते स्वत: नैराश्यात वगैरे गेलेले नाहीत. उलट त्यांनी नैराश्यावर मात कशी करायची याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये बैल चारा खात आहेत. तर धर्मेंद्र शांतपणे गरमागरम सूपचा आनंद घेताना दिसत आहेत. “आयुष्य आनंदाने जगा. कुठल्याही गोष्टीचं जास्त टेन्शन घेऊ नका. ड्रिप्रेशनलाच ड्रिप्रेशन द्या” असा संदेश त्यांनी या व्हिडीओद्वारे चाहत्यांना दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 3:13 pm

Web Title: depression ko depression de do dharmendra special tips for remove depression mppg 94
Next Stories
1 ‘मला त्या लोकांची गोष्ट माहित आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं’, दिग्दर्शकाचं सुशांतसाठी ट्विट
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर मिथुन चक्रवर्ती सुन्न; घेतला ‘हा’ निर्णय
3 ‘करण जोहर कोण आहे? काय कचरा…’ सुशांतच्या आत्महत्येनंतर बबिता फोगट संतापली
Just Now!
X