संजय लीला भन्साली दिग्दर्शित दीपिका पदुकोणचा आगामी सिनेमा ‘पद्मावती’ याचे शुटिंगला अजून सुरुवात झाली नाही. तरीही या सिनेमाशी निगडीत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या सिनेमात दीपिकाच्या पतीची भूमिका शाहिद कपूर करणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंगचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

‘पद्मावती’ सिनेमाचा सेट मेहबूब स्टुडिओमध्ये लागला आहे. एका इंग्रजवी वृत्तपत्राच्या माहितीनुसार या सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात एका गाण्याने होणार आहे. दीपिका या दिवसात या गाण्याच्या तयारीला लागली आहे. मेहबूब स्टुडिओमध्ये चित्तोडगडच्या किल्याचा सेट उभारण्यात आला आहे. इथेच ‘पद्मावती’मधील गाण्याचेही शुटिंग होणार आहे. या गाण्यात दीपिका राजस्थानी नृत्य ‘घुमर’ करताना दिसणार आहे.

सिनेमाशी निगडीत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ची शुटिंग दीपिकाच्या पहिल्या गाण्याने सुरु होणार आहे. या गाण्यासाठी राजस्थानहून प्रशिक्षित कलाकारांना बोलावण्यात आले आहे या गाण्यात तेही दिसणार आहेत शिवाय ते दीपिकाला प्रशिक्षणही देणार आहेत. मेहबूब स्टुडिओमध्ये या सिनेमाचा संपूर्ण सेट बनवून तयार झाला आहे. मेहबूब स्टुडिओशिवाय सिनेमाचा अजून एक मोठा सेट गोरेगाव फिल्म सिटीमध्येही लावण्यात आला आहे. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ज्या प्रकारचा सेट उभारण्यात आला होता तशाच प्रकारचे सेट ‘पद्मावती’मध्येही बघायला मिळणार आहेत.

दीपिका पदुकोणचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती दमदार अॅक्शन सीन देत आहे. हा व्हिडिओ तिच्या आगामी हॉलिवूड सिनेमा ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’मधला आहे. याआधीही या सिनेमातले दीपिकाचे अनेक लुक आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. पण या व्हिडिओमधली तिची अॅक्शन पाहता तिचे फॅन्स मात्र नक्कीच खुष होतील यात काही वाद नाही. या सिनेमात दीपिका स्टंटसोबत अनेक हॉट सीन देतानाही दिसत आहे. दीपिकासोबत या सिनेमात हॉलिवूडचा दमजार अभिनेता विन डिझेलही दिसणार आहे.