04 March 2021

News Flash

देव आनंद यांच्या नातवाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण

गोविंदाच्या लोकप्रिय चित्रपटाच्या रिमेकमधून ऋषी डेब्यु करत आहे.

देव आनंद

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टारकिडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये आलिया भट्ट, इशान खट्टर, जान्हवी कपूर, सारा अली खान या स्टारकिडची नाव आवर्जुन घेतली जातात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या स्टारकिडने त्यांच्यातील अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर यावर्षीदेखील काही स्टारकिड बॉलिवूडच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच दिवंगत दिग्गज अभिनेता देव आनंद यांचा नातू ऋषीदेखील लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेता गोविंदा यांचा गाजलेला ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऋषी झळकणार आहे. ‘साजन चले ससुराल २’ असं या चित्रपटाचं नाव असून ऋषी मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये ऋषीसोबत चंकी पांडे, आर्य बब्बर, हेमंत पांडे, सोनल मोन्टेरिओ आणि इशिता राज यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.

‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाची निर्मिती मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी केली असून या चित्रपटाच्या रिमेकची निर्मितीही तेच करणार आहे.

‘साजन चले ससुराल २’च्या माध्यमातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा माझा पहिल्याच चित्रपट असून या चित्रपटासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मात्र तुर्तास तरी मी या चित्रपटाविषयी फार काही सांगू शकत नाही, असं ऋषीने सांगितलं.

दरम्यान, ऋषी हा अभिनेता – निर्माता सुनिल आनंद यांचा मुलगा आहे. सुनिल यांनी ‘आनंद और आनंद’, ‘कार थिफ’ आणि मैं तेरे लिए या चित्रपटात काम केले होते. त्यांनी ‘मास्टर’ आणि ‘वेगाटर मिक्सर’ या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
मन्सूर अहमद सिद्धीकी निर्मित ‘साजन चले ससूराल’ हा विनोदी चित्रपट होता. यात गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू, कादरखान आणि सतीश कौशक यांच्या मुख्य भूमिका होत्या. १९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 8:52 am

Web Title: dev anands grandson rishi anand to make bollywood debut
Next Stories
1 हुबेहूब दिसणाऱ्या तिला पाहून अनुष्का म्हणते..
2 ..म्हणून हिना खान ‘कसौटी जिंदगी की २’ मालिका अचानक सोडणार
3 प्रियंका-निकचा बेडरुममधील ‘तो’ फोटो काढणारा कोण?, नेटकरी झाले सैराट
Just Now!
X