28 September 2020

News Flash

‘देवदास’च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘डोला रे डोला’ ठरला बेस्ट डान्स

या यादीमध्ये 'मुगल ए आझम' चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'तेजाब'मधील 'एक दोन तीन' या गाण्यांचाही समावेश आहे.

डोला रे डोला, देवदास

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष लोटली परंतु त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाने आजवर अनेक पुरस्कार मिळविले. त्यातच आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेलं गाणं ‘डोला रे डोला’ या गाण्याने इतिहास रचला असून ‘बॉलिवूडमधील बेस्ट डान्स’ च्या यादीत त्याला प्रथम स्थान मिळालं आहे. ‘युके इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने या गाण्याचा समावेश लोकप्रिय आणि आघाडीच्या गाण्यांच्या यादीमध्ये केला आहे.

बॉलिवूडमधील टॉप ५० गाण्यांमध्ये ‘डोला रे डोला’ या गाण्याने प्रथम स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे ही निवड या गाण्याची निवड जनतेचं मत, सिनेमॅटिक इम्पॅक्ट, कोरिओग्राफी आणि डान्स कोरिओग्राफीच्या आधारावर करण्यात आली आहे. तसंच या यादीमध्ये ‘मुगल ए आझम’ चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दोन तीन’ या गाण्यांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलं आहे.

दरम्यान, ‘डोला रे डोला’ या गाण्यासाठी चित्रपटातील कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. हे गाणं चित्रीत होत असताना वजनदार दागिने घातल्यामुळे ऐश्वर्या रायच्या कानातून रक्त वाहत होतं. मात्र चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत तीने ही गोष्ट सेटवर कोणालाच सांगितली नव्हती. या गाण्यात ऐश्वर्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षितने स्क्रिन शेअर केली आहे. ‘देवदास’ या चित्रपटाला आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं असून ‘टाइम्स मासिका’नेही या चित्रपटाचा समावेश टॉप १० चित्रपटांच्या यादीत केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 12:14 pm

Web Title: devdas track dola re dola declared the greatest bollywood dance number ever
Next Stories
1 राखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी
2 छोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम
3 #athensmarathon2018 : मिलिंदनं दिलं प्रशिक्षण, अंकितानं पहिल्यांदाच पार केली पूर्ण मॅरेथॉन
Just Now!
X