News Flash

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची हटके लव्ह स्टोरी!

देवदत्त नागे एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे

फुलपाखरू, फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का किंवा ‘युवा सिंगर एक नंबर या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मालिका असोत किंवा साजणा , ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण किंवा प्रेम पॉइझन अथवा युवा डान्सिंग क्वीन’ सारख्या आता सुरु असलेल्या नव्या फ्रेश मालिका असोत प्रेक्षकांनी नेहमीच झी युवा वाहिनीवरील या सर्व मालिकांचा आनंद घेतला आहे .आता ‘झी युवा’वर लवकरच आणखी एक उत्कृष्ट धमाल विनोदी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे ‘डॉक्टर डॉन’.

या मालिकेचा प्रोमो झी युवा वाहिनीवर दाखवला जात आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे नावाजलेले कलाकार मालिकेमध्ये काम करत आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे .सध्या सुरु असलेला प्रोमो अतिशय मजेशीर असून यात श्वेता शिंदे एका हॉस्पिटलच्या डीनची भूमिका साकारत आहे. प्रोमोचीची सुरुवात श्वेता शिंदेपासून होते. ती हॉस्पिटलमधल्या रुग्णांची चौकशी करत एका रुग्णाच्या बेडजवळ येते, तेव्हा तिला कळतं की तो रुग्ण गोळ्या घेत नाहीये. त्यावर श्वेता म्हणते ‘ घेत नसतील तर जबरदस्ती दे.. ‘ यावेळी अतिशय नखरेल लूकमध्ये आपल्याला देवदत्त नागे हे ऐकताना दिसतो आणि आपल्या बंदुकीमध्ये औषधाची गोळी टाकून ती बंदूक त्या रुग्णाच्या तोंडात टाकतो. हा मजेशीर प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

आणखी वाचा : बरं झालं आई-बाबांनी घटस्फोट घेतला- सारा अली खान

देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या मालिकेत देवदत्त आणि श्वेताची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत . डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना १२ फेब्रुवारीपासून मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:58 pm

Web Title: devdatta nage and shweta shinde love story ssv 92
Next Stories
1 नोरा व रेमोमध्ये फिल्म फेअर मिळवण्यासाठी झाली बाचाबाची; व्हिडीओ झाला व्हायरल..
2 मोदीजी, करोनाचा खात्मा करण्यासाठी मी चीनला चाललेय: राखी सावंत
3 अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने सलमान, अक्षय, रणवीर सिंगच्या चित्रपटांना टाकलं मागे
Just Now!
X