News Flash

‘देवमाणूस’ : एक रंजक मर्डर मिस्ट्री

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो.

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही नवीन मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड एक असा चेहरा लपला आहे ज्याची कोणीच कल्पना केली नसेल.

या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात ‘लागीरं झालं जी’ फेम भैय्यासाहेब म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिका साकारणार आहे. समाजातील अपप्रवृत्तींविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मालिका सादर करण्यात येत असून त्याचे चित्रीकरण साताऱ्यात होत आहे. राजू सावंत या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. येत्या ३१ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

आणखी वाचा : ‘जाहीर माफी मागतो’ म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढावेने लिहिली मन हेलावणारी पोस्ट 

‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्याच्या जागी ‘देवमाणूस’ मालिका प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 2:59 pm

Web Title: devmanus new murder mystery serial on zee marathi channel ssv 92
Next Stories
1 ‘महेश भट्ट यांनी दिली होती जीवे मारण्याची धमकी’; जिया खानच्या आईचा खळबळजनक दावा
2 ‘जाहीर माफी मागतो’ म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढावेने लिहिली मन हेलावणारी पोस्ट
3 पुन्हा सही रे सही… भरत जाधवसाठी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट
Just Now!
X