News Flash

‘गोपी बहू’ अर्थात देवोलीना भट्टाचार्यने शेअर केला व्हिडीओ; फॅन्स संतापले

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे संतापलेल्या फॅन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. फक्त फॅन्सच नव्हे तर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

(Photo:Instagram@devoleena)

छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य सध्या तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आलीय. देवोलीना तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती शेअर करत असलेल्या वेगवेगळ्या फोटोज आणि व्हिडीओजवर तिचे फॅन्स नेहमीच कौतुक करताना दिसून येतात. ‘गोपी बहू’च्या भूमिकेत झळकलेल्या देवोलीनाने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून तिच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसलाय. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. फक्त फॅन्सच नाही तर इतर सेलिब्रिटी सुद्धा तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.

‘गोपी बहू’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये देवोलीना ऑफ शोल्डर ब्लॅक शिमरी गाउनमध्ये दिसून आली. सोबतच गळ्यात चोकर आणि माथ्यावर बिंदी घातलेली असून तिचा एक वेगळाच लुक पहायला मिळाला. या व्हिडीओमधला तिचा न्यूड मेकअप तिच्या लूकला अगदी साजेसा दिसून येतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

अभिनेत्री देवोलीनाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सनी संतापून कमेंट्स करण्यास सुरवात केली. यातील एका युजरने लिहिलं, “वेस्टर्न आउटफिटमध्ये तुम्ही चांगले दिसत नाहीत, मग कशाला तो परिधान करता ?”. तर “अरे देवा, या गोपी बहूला झालंय काय ?” असं विचारत आणखी दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली. देवोलीनाच्या या व्हिडीओला आतापर्यंत ३८ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना भट्टाचार्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत तिने ‘गोपी बहू’ची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर ती घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. सध्या देवोलीनाला तिच्या खऱ्या नावापेक्षा जास्त ‘गोपी बहू’ च्या नावाने ओळखलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 6:35 pm

Web Title: devoleena bhattacharya western outfit video viral fans trolls on social media watch here video prp 93
Next Stories
1 ‘इंडियन आयडलमध्ये अंजली गायकवाडला परत आणा’, नेटकऱ्यांनी केली मागणी
2 FWICEच्या सदस्यांच्या लसीकरणास सुरूवात, आदित्य चोप्रांनी घेतला पुढाकार!
3 एंथोलॉजी सीरिज ‘रे’ चा ट्रेलर रिलीज; चार जबरदस्त कहाण्यांच्या फ्यूजनसाठी व्हा तयार !
Just Now!
X