24 September 2020

News Flash

‘दीदी पँट लूज है’ म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिनेत्रीचे भन्नाट उत्तर

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आजकाल कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. पण सध्या सोशल मीडियावर कलाकारांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. असेच काहीसे ‘देवों के देव… महादेव’ मालिकेत काम करणारी अभिनेत्री सोनारिका भदोरियासोबत झाले आहे.

सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा टॉप आणि थोडी लूज जिन्स परिधान केली आहे. ती या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

Are you lost babyboy?

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika) on

नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तू तुझ्या साईजपेक्षा मोठी का जिन्स घातली आहेस असे विचारले आहेत. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘दीदी पँट लूज है’ असे म्हटले आहे. सोनारिकाने या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. तिने ‘बिलकुल आपके दिमाग की तरह’ असे म्हणत उत्तर दिले आहे.

असे पहिल्यांदाच झालेले नाही. आजवर अनेक बॉलिवूड कलाकारांना त्यांचे कपडे, मेकअप, त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 4:42 pm

Web Title: devon ke dev mahadev fame sonarika bhadoria loose jeans grab attention avb 95
Next Stories
1 “सुशांतच्या नावाखाली कंगनाने स्वत:साठी Y+ सुरक्षा मिळवली”
2 अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या तारखेला होणार प्रदर्शित
3 ‘शिवीगाळ करायची असेल तर मला कर पण कृपया…’; स्वरा भास्करची कंगनाला विनंती
Just Now!
X