25 October 2020

News Flash

PHOTO : इशानचे जान्हवीसाठी कायपण!

इशान आणि जान्हवी 'धडक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

इशान खत्तर

जान्हवी कपूर आणि इशान खत्तर ही दोन्ही नावं सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत. धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची निर्मिती असणाऱ्या ‘धडक’ चित्रपटातून हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून, जान्हवी आणि इशान एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहेत. बऱ्याच कार्यक्रमांना आणि चित्रपटाच्या सेटवरही त्यांच्यातील सुरेख नातं पाहायला मिळतं. बी टाऊनमधल्या या नव्या जोडीविषयी आणखी एक चर्चा नुकतीच पाहायला मिळाली. कारण जान्हवीसाठी इशानने चक्क पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. हा कोणत्याही चित्रपटासाठी केलेला स्टंट नसून इशानने खरचं असं केलं आहे.

पण, त्याने खरंच जान्हवीसाठी असं केलं का, हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करत आहे. इशान आणि जान्हवी हे सध्या चित्रपटासाठी सराव करण्याच्या निमित्तानेही बराच वेळ एकत्र असतात. अशाच एका कारणामुळे जान्हवी जीमच्या खाली तिच्या कारमध्ये इशानची वाट पाहात होती. त्याचवेळी जीमजवळ छायाचित्रकारांनी गर्दी केल्याचं इशानच्या लक्षात आलं. जीममधून बाहेर पडताना छायाचित्रकारांची गर्दी टाळण्यासाठी इशानने पहिल्या मजल्यावरुन खाली येण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला.

Valentine’s Week 2018: तिने त्याला लिहिलेलं पत्र…

इशानने पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आणि तो कारमध्ये गेला. ‘जान्हवी कारमध्ये त्याची वाट पाहत होती. तेव्हा लिफ्टने खाली येण्याऐवजी त्याने पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतूनच उडी मारली आणि तो कारपर्यंत पोहोचला’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचं वृत्त ‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलं आहे. इशान आणि जान्हवी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सध्या बरीच मेहनत घेत आहेत. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच या दोघांचाही चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 3:04 pm

Web Title: dhadak fame new comer actor ishaan khatter does balcony stunt for co actor janhvi kapoor
Next Stories
1 आमिरची उंची
2 सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे सेलिब्रिटी कपलच्या नात्यात तणाव
3 व्हॅलेंटाइन व्हाया ‘What’s up लग्न’
Just Now!
X