News Flash

अखेर ‘ढगाला लागली…’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडीओ

या गाण्यातील रितेश देशमुखची एण्ट्री चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असे दादा कोंडके यांचे लोकप्रिय गाणे ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळ’ चा हिंदी रिमेक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होत्या. अखेर आज हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे प्रमोशनल गाणे म्हणून प्रदर्शित करण्यात आले असून पहिल्यांदाच एका मराठी गाण्याचा रिमेक चित्रपटाच्या प्रमोनल गाण्यासाठी करण्यात आला आहे.

नुकताच हे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. गाण्यामध्ये अभिनेता आयुषमान खुराना आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा जलवा पाहण्यासारखा आहे. गाण्याच्या सुरुवातीला ‘भाई इज बॅक’ असे म्हटले आहे. दरम्यान रितेश आयुषमानला प्रत्येक हिंदी चित्रपटाचे प्रमोशनल गाणे हे पंजाबी असते या वेळी मराठी करुन पाहूया असे सांगताना दिसत आहे. आयुषमान आणि रितेश एकद वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. सध्या ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळ’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या गाण्यातील रितेश देशमुखची एण्ट्री चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

हे गाणे दादा कोंडके यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात दादा कोंडकें यांच्यासोबत अभिनेत्री उशा चव्हाण मुख्य भूमिकेत होत्या. ‘ढगाला लागली कळ हे अतिशय लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे ऐकताच सर्वजण नाचू लागतात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा रिमेक करावा ही कल्पना एकता कपूरची होती. आम्हा सर्वांना ती कल्पना आवडली आणि ड्रीम गर्ल चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे गाणे मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही हे गाणे गणेशोत्सवादरम्यान प्रदर्शित करणार आहोत’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी म्हटले आहे.

आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात आयुषमानसह ‘सोनू के टिटू की स्विटी’मधील अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 3:21 pm

Web Title: dhagala lagli kal hindi remake release avb 95
Next Stories
1 हा अभिनेता होता करीनाचा क्रश; रिअॅलिटी शोमध्ये सांगितली ‘दिल की बात’
2 #WarTrailor : हृतिक-टायगरची खडाजंगी; हॉलिवूडला टक्कर देणारे जबरदस्त अॅक्शन सीन्स
3 बाहुबली फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?
Just Now!
X