22 September 2020

News Flash

‘ढगाला लागली…’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार हा मराठमोळा अभिनेता

चाहत्यांमध्ये गाण्याबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके यांचे लोकप्रिय गाणे ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळ’ चा हिंदी रिमेक येणार असल्याचे म्हटले जात होते. हा रिमेक आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटासाठी करण्यात येणार आहे. आता या गाण्यात एक मराठमोळा अभिनेता झळकणार असल्याचे गाण्याच्या टीझर वरुन स्पष्ट झाले आहे.

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या ट्विट अकाऊंटवर ‘ढगाली लागली कळ’ गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. गाण्याचा टीझर पाहता गाण्यामध्ये मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख एकद वेगळ्या रुपात दिसत असून ‘भाई इज बॅक’ असे म्हटले आहे. दरम्यान रितेश आयुषमानला प्रत्येक हिंदी चित्रपटाचे प्रमोशनल गाणे हे पंजाबी असते या वेळी मराठी करुन पाहूया असे सांगताना दिसत आहे. या गाण्यातील रितेश देशमुखचा सहभाग चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. आता चाहते गाण्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे गाणे दादा कोंडके यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात दादा कोंडकें यांच्यासोबत अभिनेत्री उशा चव्हाण मुख्य भूमिकेत होत्या. ‘ढगाला लागली कळ हे अतिशय लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे ऐकताच सर्वजण नाचू लागतात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा रिमेक करावा ही कल्पना एकता कपूरची होती. आम्हा सर्वांना ती कल्पना आवडली आणि ड्रीम गर्ल चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे गाणे मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही हे गाणे गणेशोत्सवादरम्यान प्रदर्शित करणार आहोत’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 3:05 pm

Web Title: dhagala lagli kal song hindi remake riteish deshmukh entry avb 95
Next Stories
1 चाहतीच्या फॅशनसमोर फिकं पडलं दीपिकाचं सौंदर्य
2 मदर तेरेसा यांच्यामुळे प्रियांकाला मिळाला ‘मिस वर्ल्ड’चा किताब
3 प्रदर्शनापूर्वीच सलमानचा ‘ईन्शाल्ला’ ठरतोय हिट, कमावले इतके कोटी
Just Now!
X