News Flash

..म्हणून वडिलांनाही वेळ देऊ शकत नाही जान्हवी

येत्या काळात जान्हवी करणच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्यामुळे सध्या ती बरीच व्यग्र आहे.

जान्हवी कपूर, बोनी कपूर

‘धडक’ या चित्रपटानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटांमध्येही व्यग्र झाली. या साऱ्यामध्ये तिला साथ मिळाली ती म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याची. करण सध्या जान्हवीचा या कलाविश्वात वावरण्यासाठी मदत करत असून, बऱ्याच गोष्टींसाठी तो तिला मोलाचं असं मार्गदर्शनही करत आहे. येत्या काळात जान्हवी करणच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्यामुळे सध्या ती बरीच व्यग्र आहे.

रोजच्या व्यग्र वेळापत्रकामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी इतकी गुंतली आहे की, तिला आपल्या वडिलांना म्हणजेच बोनी कपूर यांनाही पुरेसा वेळ देता येत नाही आहे. सुत्रांचा हवाला देत ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जान्हवी सध्याच्या घडीला इतकी व्यग्र आहे की, तिला बोनी कपूर यांच्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. अर्थात त्यांनी याविषयीची कोणतीही तक्रार केलेली नाही. किंबहुना आपल्या मुलीची ही वाटचाल पाहून त्यांनाही आनंदच होत आहे.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

आपल्या मुलीला मिळणारं करण जोहरचं मार्गदर्शन ही तिच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब असून, त्याविषयीच आपला आनंद व्यक्त करत बोनी म्हणाले, ‘कलासृष्टीत जान्हवीला याहून सुरेख असा मार्गदर्शक भेटलाच नसता. करण हा श्रीदेवी यांचा चांगला मित्र होता, तो माझाही खूप चांगला मित्र आहे. जान्हवीला तो स्वत:च्याच मुलीप्रमाणे सांभाळतो. माझ्या मुलांनी या कलाविश्वात त्यांच्या बळावर माझी कोणतीही मदत न घेता पदार्पण केलं याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. त्यामुळे आता जान्हवीसाठी मी कोणत्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेणार का, हे येणारा काळच ठरवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:54 pm

Web Title: dhahdak actress janhvi kapoor too busy for dad boney kapoor
Next Stories
1 Video : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील बिग बींचा लूक पाहिलात का?
2 पहिल्यांदाच एकत्र झळणार सुमित -मृणालची जोडी
3 अनुप जलोटा यांच्याशी असलेल्या नात्याविषयी जस्लीनचे वडील म्हणतात…
Just Now!
X