News Flash

‘तान्हाजी’मधला धैर्यशील म्हणतोय, “नैराश्यावर अशी करुया मात”

अजय देवगणच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून मराठमोळा अभिनेता धैर्यशीलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून मराठमोळा अभिनेता धैर्यशीलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तान्हाजी मालुसरे यांच्या सैन्यातल्या मावळ्याची भूमिका त्याने साकारली होती. धैर्यशील सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी त्याने तरुणांना खूप चांगला संदेश दिला आहे.

धैर्यशीलने नोबेल पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द स्पॅनिश कवी पाब्लो नेरूदा य़ांच्या मराठी अनुवादीत कवितेचं वाचन केलेला हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्याच्या नैराश्यग्रस्त वातावरणातून बाहेर येऊन सकारात्मकतेने पुढची वाटचाल करण्यासाठी पाब्लो नेरूदांची ही कविता खूप प्रेरित करेल असे धैर्यशीलला वाटते. तो म्हणतो, “सध्या नैराश्य, चिंता आणि काळजीचे वातावरण वैश्विक स्तरावर पाहायला मिळतेय. पाब्लो नेरूदा हे विश्वकवी होते. त्यांची ‘To start dying slowly’ ही कविता कुठे तरी आपली सध्याची मनस्थिती दर्शवणारी आणि परिस्थितीतून मरगळ झटकून पूढे वाटचाल करायला प्रेरित करणारी आहे, असं मला वाटतं. सध्या आपण घरी अडकलो आहोत. आपली पुढची वाटचाल कशी असावी याचा विचार करायची, चिंतन करायची हीच खरी वेळ आहे.”

धैर्यशील पुढे म्हणतो, “To start dying slowly कवितेचा अनुवाद असलेली ‘तुम्ही मरताय हळूहळू’ या कवितेचा गाभा लक्षात घेऊन आत्मचिंतन केले तर कवितेतलं तत्वज्ञान निश्चितच नैराश्यातून बाहेर काढायला मदत करणार आहे. मला कायम असं वाटतं आलंय की, आपली हल्लीची पिढी खूप वरवरचं आयुष्य जगत आहे आणि कुठेतरी ही कविता आपल्याला जगण्याचा खरा दृष्टिकोन देते.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 5:02 pm

Web Title: dhairyashil from tanhaji movie posted beautiful video about depression ssv 92
Next Stories
1 “दर वर्षी हे चिनी लोक हृदय तोडतात”; अभिनेत्याचा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ला विरोध
2 ‘कुछ कुछ होता है’मध्ये सलमान ऐवजी या अभिनेत्याची निवड केली होती करण जोहरने
3 राजकीय फायद्यासाठी स्थलांतरितांना मदत केल्याचा आरोप; सोनू सूद म्हणतो..
Just Now!
X