21 May 2018

News Flash

‘हे’ कारण सांगून सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरीचं स्थळ

या नकारामुळे माधुरीच्या आई- वडिलांना फार दुःख झाले. पण, त्यानंतर माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली.

माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर

माधुरी दीक्षितच्या अदांनी आजही लाखो चाहते घायाळ होत असतील यात काही शंका नाही. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला आजही तयार होतात. अशाच या हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस. आपली बायको ही माधुरी दीक्षितसारखीच असावी अशी अनेक मुलांची अपेक्षा असते. पण तुम्हाला माहित आहे का की अरेंज मॅरेजमध्ये खुद्द माधुरी दीक्षितलाही नकार पचवायला लागला होता.

madhuri dixit माधुरी दीक्षित

असे म्हटले जाते की, माधुरीच्या लग्नाचा जेव्हा तिच्या घरातले विचार करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सुरेश वाडकर हे नाव आलं होतं. याबद्दल वाडकरांना विचारण्यातही आलं होतं. पण त्यांनी माधुरीचं आलेलं स्थळ स्पष्टपणे नाकारलं. माधुरीचं घर पारंपरिक विचारांच असल्यामुळे त्यांना माधुरीने सिनेमांमध्ये काम करणं फारसं पसंत नव्हतं. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे तिचं स्थळ घेऊन गेले.

जेव्हा माधुरीचे वडील वाडकरांकडे हे स्थळ घेऊन गेले होते तेव्हा तेही संगीतसृष्टीत आपला जम बसवत होते. माधुरीच्या आणि वाडकर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता. या नकारामुळे माधुरीच्या आई- वडिलांना फार दुःख झाले. पण, त्यानंतर माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली. या घटनेनंतर अनेकदा माधुरीच्या सिनेमांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनही केलं.

तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला.

१५ मे १९६७ साली माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला.त्यानंतरची माधुरीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सर्वश्रूत आहेतच. या सर्व घटनेनंतर माधुरीने १९८४ मध्ये ‘अबोध’ सिनेमातून पदार्पण केले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलं असून ती आपल्या संसारात फार सुखी आहे.

First Published on May 15, 2018 4:12 pm

Web Title: dhak dhak girl madhuri dixit wife of dr nene say love with suresh wadkar
 1. Kunda Patil
  May 15, 2018 at 11:24 pm
  LOT OF GOOD WISHESOIN UR BIRTHDAY, ENJOY WITH FAMILY.
  Reply
  1. Nana Chitnis
   May 15, 2018 at 9:54 pm
   सौ.माधुरी नेने याना वाढदिवसाच्या, आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा, चिटणीस कुटुंबीय (भारत, इंग् , अमेरिका)
   Reply
   1. Mangu Guruji
    May 15, 2018 at 4:50 pm
    सुभाष घईनी मात्र मजा मारली.
    Reply