News Flash

कार्तिकच्या ‘धमाका’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पाहिलात का?

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. आजच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना दिली आहे.

कार्तिकने ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. टीझरमध्ये कार्तिक एका न्युज अॅकरच्या भूमिकेत दिसतं आहे. टीझरच्या सुरूवातीला कार्तिक न्युजरूम मध्ये बसून किंचाळतो आणि बोलतो बंद करा हा कॅमेरा, बंद करा. तो कोणत्या तरी शो साठी नकार देताना दिसत आहे. तर त्याची एडिटर त्याला म्हणते, द शो मस्ट गो ऑन. कार्तिक बोलतो, मी हे नाही करू शकतं. नंतर कार्तिक स्वत:ला सांभाळतं कॅमेरा फेस करतो आणि बोलतो, मी आहे अर्जुन पाठक भरोसा २४/७ मधून…मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन.. हा टीझर शेअर करतं “मी अर्जुन पाठक आहे. मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन”, अशा आशयाचे कॅप्शन कार्तिकने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या चित्रपटात कार्तिकच्या भूमिकेचे नाव अर्जुन पाठक आहे. या चित्रपटाची पटकथा मुंबईवर आधारीत आहे. यात एक अनोळखी व्यक्ती अर्जुनला फोन करून वरळी सीलिंकवर ब्लास्ट करण्याची धमकी देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

२२ नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त ‘धमाका’ या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. या चित्रपटात कार्तिक सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर अभिनेता विकास कुमार आणि विश्वजित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. ‘धमाका’ नेटफ्लिक्सवर १९० देशांत प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 1:52 pm

Web Title: dhamaka teaser kartik aaryan is a nervous news anchor reporting on terror attack watch trailer dcp 98
Next Stories
1 सहा महिन्यांनी त्या ऑफिसमध्ये पोहोचली कंगना, शेअर केला Before and after फोटो
2 “अरे, तुझे कपडे कुठे गेले?” चाहत्यांचा जॉनला सवाल
3 भूमीने शेअर केले सुशांतचे फोटो; जुन्या आठवणींना उजाळा
Just Now!
X