News Flash

धनश्री काडगावकरचं बेबी बंपसह नवीन फोटोशूट

वहिनीसाहेब लवकरच होणार आईसाहेब

धनश्री काडगावकर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. धनश्री आई होणार असून सोशल मीडियावर नुकतीच तिने ही गुड न्यूज दिली. तिने बेबी बंपसह फोटोशूट केलं असून त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री अल्पावधीत प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या नंदिता वहिनी म्हणून तिची ओळख आहे. धनश्रीने पतीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट करत गरोदर असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने नवीन फोटोसुद्धा पोस्ट केले. धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट

धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. ‘माझिया प्रियाला..’ मध्ये तिने अगदी खलनायिकी अशी नाही पण तशीच काहीशी छटा असणारी भूमिका साकारली होती. तर ‘गंध फुलांचा…’ मालिकेत ती अगदी सोज्ज्वळ भूमिकेत होती. पण, नंदिता वहिनीच्या भूमिकेने धनश्रीला आज वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 5:02 pm

Web Title: dhanashri kadgaonkar flaunts her baby bump in this new photo shoot ssv 92
Next Stories
1 सलमानसोबत काम करुनही ‘तारक मेहता’मधील अभिनेत्याला मिळाले नव्हते काम
2 वृत्तवाहिन्यांविरोधात याचिका म्हणजे “टिचर टिचर, वो अर्णब मुझे..”
3 “सिद्धार्थ आणि निक्की दोघंच शो चालवतायेत का?”; माजी स्पर्धक ‘बिग बॉस’वर नाराज
Just Now!
X