गायिका आणि आरजे सुचित्रा कार्तिक सध्या चर्चेत आली आहे. तिचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले गेलेले खासगी फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण हे फोटो सुचित्राचे नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि इतर कलाकारांचे आहे. हे फोटो कलाकारांच्या खासगी पार्ट्यांमधले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष, हंसिका, अनिरुद्ध आणि दिव्यदर्शिनी यांचे खासगी फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

सुचित्राला जेव्हा तिच्या अकाऊंटवरुन असे काही फोटो शेअर केले गेले आहेत हे कळले तेव्हा तिने लगेच ते फोटो डिलिट केले. शिवाय आपले ट्विटर अकाऊंटची सेटिंग तिने बदलली. शुक्रवारी जेव्हा हे फोटो समोर आले तेव्हा सुचित्राला स्वतःला हा फार मोठा धक्का होता. धनुष, हंसिका मोटवानी, अनिरुद्ध रविचंदर, एंड्रिया जेर्मिह आणि दिव्यदर्शिनी यांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे कारण काय असेल हे तिलाही कळले नाही.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

2

3

4

फोटो शेअर केलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना सुचित्रा म्हणाली की, माझे अकाऊंट हॅक केले होते. तिच्या मनात कोणाबद्दलही वाईट किंवा द्वेषाची भावना नाहीये. तिने ट्विट करत स्पष्ट केले की, ‘मी कलाकारांसोबत फिरत नाही, माझ्याकडे यांपैकी कोणाचेही फोटो नाहीत, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मी स्वार्थी नाही. जी व्यक्ती हे करत आहे त्याला असे वाटत असावे की मी माझे अकाऊंट डिलिट करेन. मी पुढच्या काही सेकंदात हे करु ही शकते. पण मला माहितीये की इथे असेही काही व्यक्ती आहेत जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच मी माझे अकाऊंट डिलिट करणार नाही. यापेक्षा अजून चांगले काय करता येईल याचा मी विचार करत आहे. पण तरीही मी माझ्या अकाऊंटची सेटिंग बदलत आहे. मी आधीच माझ्या चाहत्यांची माफी मागते.’

कदाचित सुचित्राला तिचे ट्विटर अकाऊंट कोणी हॅक केले हे कळले असावे. म्हणूनच तिने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘जे फोटो लिक झाले आहेत त्या फोटोंमध्ये स्वतःचा फोटो टाकून त्या हॅकरला असे वाटत आहे की त्याच्यावर संशय येणार नाही.’

5-mos_030317050728