काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. दरम्यान हेमा मालिनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडाओमध्ये त्यांना झाडू मारण्याच्या पद्धतीवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील हेमा मालिनी यांची ट्विट करत खिल्ली उडवली होती. त्यांचे हे मजेशीर ट्विट चाहत्यांना आवडले परंतु हेमा मालिनी यांना ते आवडले नसल्याचे म्हटले जात आहे.

आता धर्मेंद्र यांनी ट्विटद्वारे हेमा मालिनी यांची आधी केलेल्या ट्विटबद्दल माफि मागितली आहे. त्यांनी ट्विटमध्ये त्यांचा एक जूना हात जोडलेला फोटो शेअर केला आहे. ‘कधी कधी मी काहीही बोलतो. ही काहीची भावना लोक काही समजून बसले आहेत यार. गोष्ट झाडूचीही.. कधी नाही करणार. देवा मला माफ कर’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.

‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या या मोहिमेला देशवासीयांनीही चांगला प्रतिसाद दिला. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह इतर भाजपा खासदारांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

दरम्यान हेमा मालिनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी तिला ट्रोल ही केले होते. त्यामधील “सर, मॅडमनी कधी खऱ्या आयुष्यात हातात झाडू पकडला आहे का?” या कमेंटवर धर्मेंद्र यांनी मजेशीर रिप्लाय दिला होता. ‘हो, चित्रपटांमध्ये. मला पण अडाणीच वाटत होती’ असे म्हणत धर्मेंद्र यांनी हेमा मालिची खिल्ली उडवली होती.