‘कुत्ते कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा’ असे म्हणत खलनायकाला धोपटणारा रजतपटावरील ‘शेर’दिल धर्मेद्र यांचे एक हळुवार हृदयाचा माणूस असे वेगळेच रूप श्रोत्यांनी अनुभवले. ‘एक होती है तारीफ अहमियतकी, इन्सानियत की लेकिन कदर होती है’ हा शेर आपल्या खास शैलीत पेश करीत त्यांनी सर्वानाजिंकले.

यूएसके फाउंडेशनतर्फे अ‍ॅक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या हस्ते धर्मेद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अ‍ॅंड रुरल डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला, खासदार संजय काकडे आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे या वेळी उपस्थित होत्या. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिकाराजे गायकवाड, प्रसिद्ध लेखक चेतन भगत, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेत्री रविना टंडन, शैक्षणिक कार्याबद्दल विश्वजित कदम, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, उद्योजक अजिंक्य फिरोदिया, युवा उद्योजिका अनन्या बिर्ला आणि टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना ‘ऊर्जा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हुतात्मा सौरभ फराटे यांना प्रदान करण्यात आलेला शौर्य पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्यावतीने त्यांचे शिष्य दिलीप काळे यांनी पुरस्कार स्वीकारला.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

अमृता फडणवीस म्हणाल्या, की स्त्रियांच्या सबलीकरणासाठी त्यांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आपल्या देशातील अनेक मुलींना विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मोफत शिक्षण आणि शिक्षणाचा हक्क या माध्यमातून सरकार प्रयत्नशील आहे. आपणही प्रत्येकाने किमान एकाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करावा. ७० टक्के स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. आपण याविरुद्ध एकत्र लढायला हवे.नसिरुद्दीन शाह यांनी हा पुरस्कार अभिनेते ओम पुरी यांना समíपत केला. गेल्या ४६ वर्षांच्या मैत्रीत मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. राजश्री बिर्ला यांनी आपल्या मनोगतामध्ये बिर्ला फाउंडेशनमार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. उषा काकडे यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संजय काकडे यांनी प्रास्ताविक केले. योगिनी गांधी यांनी सूत्रसंचालन केले.