News Flash

धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सावत्र आजी हेमा मालिनीचं केलं कौतुक; म्हणाला, “एक शानदार अभिनेत्री”

हेमा मालिनी यांच्या एक-दोन फिल्म्स ही पाहिल्या

बॉलिवूडमधील ‘हीमॅन’ धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलने दोन वर्षांपूर्वीच ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. करण देओलही आता आजोबा धर्मेंद्र आणि वडील सनी देओलप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवायला सुरवात केली आहे. नुकतंच करण देओलने एका मुलाखतीत बोलताना त्याची सावत्र आजी म्हणजेच हेमा मालिनी यांचं कौतुक केलंय. हेमा मालिनी एक शानदार अभिनेत्री आहेत, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर हेमा मालिनी यांच्या बॉलिवूड करियरला ‘महान’ असं म्हटलंय.

बॉलिवूडचे ‘हीमॅन’ धर्मेंद्र आणि ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांच्या नात्याची स्टोरी एका फिल्मचीच स्टोरी वाटेल अशी ठरली आहे. या दोघे ही त्यांच्या सुरपहिट फिल्म्स व्यतिरिक्त त्यांच्यातील नात्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. धर्मेंद्र केवळ १९ वर्षाचे असताना त्यांचं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. त्या दोघांना सनी, बॉबी, अजीता आणि विजेता अशी दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांचं हे अरेंज्ड मॅरेज होतं. त्यानंतर १९७५ मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आणि काही वर्षातच दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल आणि सावत्र आई हेमा मालिनी यांच्यातील नातं काही फारसं चांगलं नव्हतं. हेमा मालिनीच्या मुली ईशा आणि अहाना यांची लग्न झाली तेव्हा सुद्धा धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची मुलं सनी आणि बॉबी लग्नात उपस्थित नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Deol Takhtani (@imeshadeol)

सनी देओलचा मुलगा करण देओलला एका मुलाखती दरम्यान सावत्र आजी हेमा मालिनीबद्दल प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना करण देओलने हेमा मालिनी यांचं कौतुक केलंय. यावेळी तो म्हणाला, “हेमा मालिनी एक महान कलाकार आहेत…त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून ते शेवटच्या चित्रपटापर्यंत शानदार अभिनय केलाय.” तु कधी हेमा मालिनी यांचे चित्रपट पाहिलेस का ? असा प्रश्न त्याला विचारल्यानंतर तो म्हणाला, “होय, मी त्यांचे एक-दोन चित्रपट पाहिलेत…त्याच आधारावर मी हे सांगतोय की त्यांचं करियर महान ठरलंय आणि त्या एक जबरदस्त अभिनेत्री आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

‘त्या’ घटनेत पहिल्यांदा हेमा मालिनी यांच्याशी बोलला सनी
हेमा मालिनी यांची ऑटोबायोग्राफी ‘बियॉंड द ड्रीम गर्ल’मध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केली आहेत. ‘दिल आशना है’ या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी एका घटनेदरम्यान सनी देओल पहिल्यांदा हेमा मालिनीसोबत बोलला असल्याचं सांगितलं. हेमा त्या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिकाही होत्या. त्यांना डिंपल कपाडिया आणि मिथून चक्रवर्ती यांचा पॅराग्लायडींग सीन शूट करायचा होता. हा सीन विमानातून शूट होणार होता. पण शूटिंगच्या पहिल्या दिवशीच पायलटचा अपघात झाला. या घटनेनंतर घाबरून डिंपलने ही गोष्ट सनी देओलला सांगितली. हे कळताच सनी देओल लगेचच घटनास्थळी आला आणि सेटवर येऊन हेमा मालिनीला भेटला. त्यावेळी हेमा मालिनी यांनी सनीला डिंपलला काहीच होणार नाही, असा विश्वास दिला.

कधी धर्मेंद्रच्या घरी गेल्या नाहीत हेमा मालिनी
धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या घरी गेल्या नाहीत. हेमा मालिनी यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं, “मला कुणाला त्यांच्या आयुष्यात डिस्टर्ब करायचं नव्हतं…धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे जे केलं यातच मी आनंदी आहे…त्यांनी वडिलांची भूमिका पुर्णपणे निभावली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 6:11 pm

Web Title: dharmendra grandson karan deol praised hema malini said she is a brilliant actress prp 93
Next Stories
1 ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा
2 आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर’
3 Video: ‘द फॅमिली मॅन २’ नवा मजेशीर प्रोमो प्रदर्शित
Just Now!
X