News Flash

धर्मेंद्र यांनी फोटो शेअर केलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

माझा निरागस मुलगा असे त्यांनी कॅप्शन दिले आहे

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे चित्रपटांपासून लांब असले तरीही ते सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत सोशल मीडियावर त्यांच्या आयु्ष्याशी संबंधी काही ना काही पोस्ट करत असतात. नुकतात त्यांनी त्यांच्या मुलाचा लहानपणीचा फोटो ट्विटद्वारे शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये नक्की त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओल आहे की बॉबी देओल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. हा सनी देओलचा लहानपणीचा फोटो आहे. ‘माझा सर्वात निरागस मुलगा. मी त्याचा टॉवेल न लावता फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. नको बाबा नको…असे सनी त्यावर म्हणाला. मित्रांनो त्याचा साधेभोळेपणा मला आजही दु:खी करतो. सनी, लव्ह यू. पल पल दिल के पास चित्रपटासाठी खूप शूभेच्छा’ असे त्यांनी कॅप्शन दिले होते.

‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सनी देओलच्या खांद्यावर असून या चित्रपटाची निर्मिती देखील त्यानेच केली आहे. या चित्रपटातून सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 6:40 pm

Web Title: dharmendra share son photo guess who is he avb 95
Next Stories
1 जबरा फॅन! अक्षय कुमारसाठी त्याने केला ९०० किमी पायी प्रवास
2 मिस इंडिया वर्ल्डवाइड श्री सैनीचे मुंबईत जल्लोषात स्वागत
3 दिशा पटानीसाठी ‘हा’ अभिनेता परफेक्ट; टायगरच्या बहिणीने सुचवले नाव
Just Now!
X