बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी धर्मेंद्र चक्क एका अरबी चाहत्यामुळे चर्चेत आहेत. या चाहत्याने धर्मेंद्र यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. या अनोख्या गिफ्टचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – टायगरच्या बहिणीनं मादक अदांनी अनेकांना केलं घायाळ; सेलिब्रिटीही झाले फिदा
धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक अरबी व्यक्ती त्यांची यांची स्तुती करताना दिसत आहे. तो धर्मेंद्र यांचा खूप मोठा चाहता आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने एक चित्र काढलं आहे. अन् हे चित्र त्याने धर्मेंद्र यांना गिफ्ट म्हणून दिलं आहे.
pic.twitter.com/ZmxnZwvg9G love you Hamad, pay my love and respect to Mohammed Al Masoud for this lovely painting.
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 27, 2020
अवश्य पाहा – “पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने समिक्षकांना दिली होती धमकी
“हमद धन्यवाद, मोहम्मद अल मकसूद तू काढलेलं हे चित्र पाहून मी निशब्ध झालो. इतका सन्मान आणि प्रेम दिल्याबद्दल तुझे आभार…” अशा आशयाचं ट्विट करुन धर्मेंद्र यांनी या अरबी चाहत्याचे आभार मानले. धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 4:39 pm