News Flash

वयाच्या ८५ व्या वर्षी वॉटर एरोबिक करतानाचा धर्मेंद्र यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना आनंदी आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे.

धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. (Photo Credit : Dharmendra Instagram)

बॉलिवूडचे दिग्ज अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीपासून लांब असले, तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरू हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र हे वॉटर एरोबिक्स करताना दिसतं आहेत.” मित्रांनो, देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शुभेच्छांमुळे…मी योगा, वॉटर एरोबिक्स आणि थोडा व्यायाम करायला सुरूवात केली आहे. चांगले आरोग्य हाच आयुष्याचा सर्वात उत्तम आशीर्वाद. आनंदी आणि निरोगी रहा,” अशा आशयाचे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. धर्मेंद्र यांच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सगळ्यांना फिट राहण्याचा संदेश दिला आहे.

आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

धर्मेंद्र आता ‘अपने २’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटसाठी धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनिल शर्मा करणार आहेत. करोना संसर्गामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अजून सुरूवात झालेली नाही. तर, या आधी त्यांनी ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 11:31 am

Web Title: dharmendra starts water aerobics yoga and light exercise shared video dcp 98
Next Stories
1 सायरा बानो यांनी शेअर केला दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो
2 महेश भुपतीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत लारा म्हणाली…
3 तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या ‘हसीन दिलरुबा’चा टीझर रिलीज; 2 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर होणार स्ट्रीम
Just Now!
X