20 January 2021

News Flash

“तुम्हीही सोडून गेलात?”; जगदीप यांच्या निधनामुळे ‘शोले’मधील अभिनेत्याला मानसिक धक्का

'शोले' चित्रपटातील अभिनेते जगदीप यांच्या निधनामुळे झाले भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. जगदीप यांच्या निधनामुळे अभिनेता धर्मेंद्र यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते”; जगदीप यांचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…

“तुम्ही देखील निघून गेलात? आणखी एक मानसिक धक्का… ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचे ट्विट करुन धर्मेंद्र यांनी जगदीप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मेंद्र आणि जगदीप यांनी ‘शोले’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. जगदीप यांच्या निधनामुळे धर्मेंद्र यांना प्रचंड दु:ख झालं आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – उज्जैन पोलिसांकडून विकास दुबेला अटक; नेटकऱ्यांनी Memes मधून घेतली UP पोलिसांची फिरकी

जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली. ‘अब दिल्ली दूर नही’, ‘मुन्ना’, ‘हम पंछी डाल के’ हे बालकलाकार म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही गाजले होते. त्यानंतर त्यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटापासून विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. तसंच त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 5:48 pm

Web Title: dharmendra tweet on actor jagdeep death mppg 94
Next Stories
1 भारतीय इकडे घरात अडकून; तिकडे सनी लिओनीची कुटुंबासहीत बीचवर धमाल
2 Video : “..अन् पैजेचा विडा चित्रपट मिळाला”
3 सासू झाली आई, ‘अग्गंबाई सासूबाई’ एका नव्या वळणावर
Just Now!
X