News Flash

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाचं परीक्षण करणार ‘धर्मेश सर’

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत.

नृत्यविश्वातील एक प्रख्यात नाव म्हणजे ‘धर्मेश सर’. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधीच मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करत आज ‘धर्मेश सर’ नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे. अशाच सगळ्या नृत्य कलाकारांसाठी सोनी मराठी वाहिनी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम घेऊन आली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून धर्मेश सर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडिओज पाठवायचे आहेत. ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२० आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू असून लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 4:59 pm

Web Title: dharmesh sir judging marathi dance show maharashtras best dancer ssv 92
Next Stories
1 १५ नोव्हेंबरपासून सुरू होतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’
2 Video : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया
3 ‘तारक मेहता…’मधील बापूजी एका एपिसोडसाठी घेतात इतकी फी
Just Now!
X