कोरिओग्राफर व डान्सर धर्मेश येलांडे आता ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. धर्मेश याआधी हिंदी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून झळकला होता. पण मराठीत तो पहिल्यांदात परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांकडून स्पर्धकांसाठी केल्या जाणाऱ्या टिप्पणीवरून वाद होताना दिसतं. मात्र या टिप्पणीकडे धर्मेश कसा पाहतो, ते जाणून घ्या..

धर्मेशसुद्धा रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आला आणि पुढे त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तो लवकरच लेखक व दिग्दर्शकाच्या भूमिकेतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.