27 September 2020

News Flash

VIDEO: ‘ढिंच्याक पूजा’चे ‘नाच के पागल’ हे नवीन गाणं ऐकून नेटकरी झाले पागल

'हे गाणं स्वत:च्या हिंमतीवर ऐका'

Dhinchak Pooja Naach Ke Pagal

गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम असा जो काही आपला पूर्वापार चालत आलेला समज आहे, तो आपल्या ‘आवजा’ने खोडून काढणारी ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे नवीन गाणं घेऊन. ‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ या तीन ‘वेड’ लावणाऱ्या गाण्यांच्या यशानंतर ढिंच्याक पूजाने नुकतेच आपले नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. ‘नाच के पागल’ असे या गाण्याचे नाव असून नेटकऱ्यांना या गाण्याने खरोखरच पागल केले आहे.

भयंकर व्हिडीओ त्याहून वाईट निर्मिती आणि त्याहून (अ)श्रवणीय आवाज असणारे हे ढिंच्याक पूजाचे हे गाणं सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. आधीच पूजाचा आवाज अगदीच श्रवणीय आहे त्यात या गाण्याचे शब्द आणि न बसणारी चाल यासर्वांमुळे हे गाणं एका वेगळ्याच उंचीला गेले आहे असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे. गाण्याचे शब्द ‘पागल हो के नाचो और नाच नाच के पागल हो जाओ’ असे असले तरी हे गाणं ऐकून ऐकून नेटकरी वेडावल्याचे चित्र ट्विटवर दिसत आहे. अनेकांनी पूजाच्या या गाण्यानंतर ट्विटवरुन आपला आक्षेप नोंदवला आहे. तुम्हीच पाहा पूजाचे हे नवीन गाणे…

अनेकांनी ‘हे गाणे स्वत:च्या हिंमतीवर ऐका’ असा सल्ला दिला आहे. या भयंकर कलाकृतीसाठी ढिंच्याक पूजाला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

किती हिंमत आहे बघू

गाणं ऐकल्यावर प्रत्येकाची एकच प्रतिक्रिया

तिच्या नावाने ओरडतात

हिंमत असेल तर ऐकून दाखवा

आता मरायलाच हवं

गाणं ऐकल्यावर

इथे त्रास होतो इथे

तिचे बाबा तिला म्हणत असतील

काय बकवास आहे

त्याने गाणं ऐकलं आणि

कॅमेरामनचे दुख:

गाण्यात संगीत शोधण्याचा प्रयत्न

दरम्यान, एकीकडे ढिंच्याक पूजावर टिका होत असताना तिने प्रदर्शित केलेले हे चौथे गाणे आहे. मागील तिन्ही गाण्यांच्या वेळेस तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. मात्र एक वृत्तानुसार तिने ‘सेल्फी मैने लेली आज’ या गाण्यातूनच सात लाखांची कमाई केली होती. एका मुलाखतीमध्ये तिने आपण व्हिडीओवरील नकारात्मक कमेंट वाचत नसल्याचे तिने सांगितले होते. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया न वाचल्याने माझ्यातील नवीन गाणी सादर करण्याची इच्छा कायम राहते असं ढिंगच्याक पूजाने मुलाखतीमध्ये सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 5:53 pm

Web Title: dhinchak pooja naach ke pagal is firing up the internet scsg 91
Next Stories
1 …म्हणून वांगणीजवळ पूराच्या पाण्यात अडकली महालक्ष्मी एक्सप्रेस
2 भारताची लाज काढली! बालीमध्ये हॉटेलमधील वस्तू चोरताना भारतीय कुटुंबाला रंगेहाथ पकडले
3 दोन केळ्यांचं बिल ४४२ रुपये , फाईव्ह स्टार हॉटेलला २५ हजारांचा दंड
Just Now!
X