27 November 2020

News Flash

“हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

'सुबह उठते हैं हम, ब्रश करते हैं हम'

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली ढिंच्यॅक पूजा आता एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपण दिवसभरात जी काही काम करतो त्यावर आधारित हे गाणं आहे. ‘रोज-रोज का काम’ असं या नव्या कोऱ्या गाण्याचं नाव तिनं ठेवलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे गाणं काही प्रेक्षकांना आवडलेलं नाही. त्यांनी सोशल मीडियावर पूजाला ट्रोल करत या गाण्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

ढिंच्यॅक पूजाने हे गाणं आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलं आहे. काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

“सुबह उठते हैं हम, ब्रश करते हैं हम,
फिर खाते हैं हम, फिर जाते हैं हम
चाय बनाते हैं हम, उसे पीते हैं हम,
नहाते हैं हम, फिर तैयार होते हैं हम.”

असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
ढिंच्यॅक पूजा एक प्रसिद्ध युटूबवर आहे. ती आपल्या अनोख्या रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ‘बापू देदे थोडा कॅश’, ‘स्वॅग वाली टोपी’, ‘होगा ना करोना’, ‘दिलोंका शूटर’ यांसारख्या अनेक गाण्यांची निर्मिती आजवर तिने केली आहे. ‘सेल्फी मैंने ले ली आज’ गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या गाण्यामुळे तिला चक्क बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकण्याची संधी मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 1:32 pm

Web Title: dhinchak pooja new song roz roz ka kaam video viral mppg 94
Next Stories
1 अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी
2 ‘अन् मग मी सोडून त्रिशूळ, भाला.. हाती stethoscope धरला…’; तेजस्विनी नवदुर्गेचा डॉक्टरांना अनोखा सलाम
3 KGF 2 ठरल्या दिवशीच होणार प्रदर्शित; कर्करोगग्रस्त संजय दत्तने सुरु केली तयारी
Just Now!
X