05 March 2021

News Flash

पाहाः आमिर-कतरिनाच्या ‘मलंग’ गाण्याचा टीझर

'धूम ३' या बहुचर्चित चित्रपटाच्या टायटल साँगनंतर आता 'मलंग' गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

| November 29, 2013 12:14 pm

आमिर आणि कतरिनाची जोडी ‘धूम ३’मुळे प्रकाशझोतात आहे. ‘धूम ३’ या बहुचर्चित चित्रपटाच्या टायटल साँगनंतर आता ‘मलंग’ गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यावर तब्बल ५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
आमिर आणि कतरिनाने चित्रपटात साहीर आणि आलिया या भूमिका साकारल्या आहेत. टीझरमध्ये काळ्या पोशाखात आपल्या अॅब्स दाखविणारा आमिर त्याला साथ देणारी चित्रपटातील त्याची प्रेमिका कतरिना पाहावयास मिळते. आमिर यात धिटपणे साहसी दृश्ये करताना दिसतो.


‘मलंग, मलंग है इश्क तेरा… ‘या गाण्यास प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळण्याची शक्यता आहे. आमिर व कतरिना यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘धूम ३’ मधील ‘मलंग’ हे गाणे बॉलिवूडमधील आता पर्यंतचे सर्वात महागडे गाणे असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात, या गाण्यामध्ये सहनर्तक म्हणून भाग घेतलेल्या २०० हून अधीक कलाकारांचे मानधन या ५ कोटी खर्चामधूनच देण्यात आले आहे. या गाण्याचा सेट उभा करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी लागला.


याआधी प्रदर्शित झालेल्या ‘धूम ३’च्या टायटल साँगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:14 pm

Web Title: dhoom 3 watch teaser of aamir khan katrina kaif in malang
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 पाहा : ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटाचा ट्रेलर
2 बिग बॉस ७: कुशालने दिली प्रेमाची कबुली
3 यशराजचा ‘गुंडे’ बंगालीतही
Just Now!
X