कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याच्या निधनामुळे एकीकडे त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलेला असताना भाऊ ध्रुव सरजा याच्यासाठी तर आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. चिरंजीवीच्या मृत्यूचा ध्रुवला खूप मोठा धक्का बसला आहे. ७ जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवीचं निधन झालं. बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. ध्रुव याने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

चिरंजीवीच्या निधनानंतर पाच दिवसांनी ध्रुव याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली असून लिहिलं आहे की, “मला तू पुन्हा हवा आहेस…तुझ्याशिवाय शक्य नाही”.

चिरंजीवीच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर ध्रुव याचा विश्वासच बसत नव्हता. अंत्यसंस्कारावेळीही त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबवत नव्हते. फार्महाऊसवर चिरंजीवीचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चिरंजीवीला ध्रुवच्या फार्महाऊसवर वेळ घालवायला खूप आवडायचं. हे त्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक होतं.

चिरंजीवी याने निधनाच्या एक दिवस आधी इन्स्टाग्रामवर आपले भाऊ ध्रुव आणि सूरज यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोत तिघांनीही लहानपणीच्या फोटोची कॉपी केली होती. यावर सारजा बंधूंनी प्रतिक्रिया देत आपण अजूनही तसेच आहोत असं म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

Then and now.. we r still the same… what say guys..??

A post shared by Chirranjeevi Sarja (@chirusarja) on

चिरंजीवी याच्या मागे पत्नी मेघना राज आहे. मेघना तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यातच चिरंजीवी यांचं निधन झालं असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.