News Flash

झी युवावर रविवारी उडणार ‘धुरळा’

जाणून घ्या वेळ

राजकारणातील खाचखळगे शिताफीनं अधोरेखित केलेला चित्रपट म्हणजे ‘धुरळा.’ हा सुपरहिट चित्रपट लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या रविवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता  झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

राजकारणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जबरदस्त प्रतिसाद दिला. राजकारणात नेमकं कधी काय होईल याची कल्पना नसते. हेच वास्तव या सिनेमातून मांडल आहे.

समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकारांची फौज आहे. अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अलका कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या उत्तम सदारीकरणामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता झी युवा वाहिनीवर या सुपरहिट चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षक घरबसल्या संपूर्ण कुटुंबसोबत घेऊ शकतात.

गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या सिनेमात उलगडण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 4:00 pm

Web Title: dhurla movie will be premiun on zee yuva avb 95
Next Stories
1 “वेदनादायी गोष्ट हीच की, जवानही शेतकऱ्याचाच मुलगा”, स्वरा भास्करचं टि्वट
2 Coolie no. 1 trailer : गोविंदा की वरुण? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा कोण आहे ‘कुली नं. १’
3 मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायण करणार मंदिरात लग्न
Just Now!
X