News Flash

विभक्त झाल्यानंतरही दिया मिर्झा आणि पती साहिल संघा दिसले एकत्र

दोघेही आपापल्या गाड्यांमधून आले होते

बॉलिवूडमधील नावाजलेली जोडपी मलायका अरोरा – अभिनेता अरबाज खान, हृतिक रोशन – सुजेन खान, अर्जुन रामपाल- मेहर यांनी घटस्फोट घेतला आहे. आता या यादीमध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघा यांचा देखील समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिया मिर्झा आणि साहिल यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यात आले आहे.

दियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे पती साहिलसोबत घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. अकरा वर्षेसोबत राहिल्यानंतर दोघांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दियाने या पोस्टमध्ये लिहिले होते. दिया आणि साहिल २०१४ मध्ये लग्न बंधनात अडकले होते. परंतु त्यांच्या रिेलेशनच्या चर्चा २००८ पासून रंगल्या होत्या. एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. घटस्फोनंतरही ते दोघे चांगले मित्र म्हणून राहणार असल्याचे दियाने पोस्टमध्ये लिहिले होते.

नुकताचा दिया आणि साहिल यांना एकत्र पाहण्यात आले. मात्र ते दोघेही आपापल्या गाड्यांमधून आले होते. बॉलिवूडमधील मलायका -अरबाज, हृतिक- सुजेन, अर्जुन रामपाल- मेहर या जोडप्यांनी घटस्फोट घेतला असला तरीही त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम असल्याचे पाहायला मिळते. दिया आणि साहिल यांनी देखील मैत्रीचे नाते कायम ठेवले असावे असे म्हटले जात आहे.

दिया राजकुमार हिराणी यांच्या ‘संजू’ या चित्रपटात रणबीर कपूरसह दिसली होती. दिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सध्या ‘काफिर’मध्ये काम करत आहे. २००० साली दियाची मिस आशिया पॅसिफिकसाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 11:40 am

Web Title: dia mirza and ex husband sahil sangha spotted together avb 95
Next Stories
1 …म्हणून रानू मंडल यांची मुलगी १० वर्षांनंतर परतली
2 मालिकांमध्येही मोरया मोरया!
3 सीधेसाधे अक्षय..
Just Now!
X