02 March 2021

News Flash

कौतुकास्पद! महिला पुजाऱ्याने बांधली दियाची लग्नगाठ

सध्या हा फोटो चर्चेत आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अभिनेत्री दिया मिर्झाने दुसऱ्यांदा लग्न केले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित तिने वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली. दियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यामधील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक महिला पुजारी पाहायला मिळते. बऱ्याच वेळा लग्नात विधी करण्यासाठी पुरुष पुजारी असतो. पण दियाच्या लग्नात मात्र महिला पुजारी सर्व विधी करताना दिसत आहे. हा फोटोपाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : घटस्फोटीत व्यक्तीसोबत दिया अडकणार लग्नाच्या बेडीत; जाणून घ्या वैभव रेखी आहे तरी कोण?

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

हा फोटो शेअर करत दियाने माझ्या लग्नातील काही आनंदाचे क्षण या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘पहिल्यांदाच महिला पूजाऱ्याने लग्न लावताना पाहिले’ असे म्हटले आहे.

ऑक्टोबर २०१४ मध्ये दियाने साहिल संघाशी पहिले लग्न केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघाने सोशल मीडिया पोस्टद्वारे विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दियाने वैभव रेखीला डेट केले. लॉकडाउनच्या काळात दिया आणि वैभव यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखेर १५ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 3:29 pm

Web Title: dia mirza and vaibhav rekhi wedding conducted by priestess avb 95
Next Stories
1 ‘फँड्री’तील शालूचा जलवा, सोशल मीडियावर राजश्रीची हवा
2 भूमी पेडणेकरचा युनेस्कोला पाठिंबा
3 …म्हणून सई-प्रसाद करणार नाहीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं परीक्षण
Just Now!
X