News Flash

“गरोदर असल्यामुळे दुसरं लग्न केलं का?”; दिया मिर्झाचं नेटकऱ्याला सडेतोड उत्तर

'या' कारणामुळे गरोदर असल्याची घोषणा आधी केली नाही

अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मीडियावरून ती पती वैभव रेखीच्या बाळीची आई होणार असल्याची बातमी दिली होती. 15 फेब्रुवारीला दिया मिर्झा वैभव रेखीसोबत विवाहबंधनात अडकली होती. त्यानंतर नुकतेच दियाने तिचे मालदिव ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत दियाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.

दियाने ती आई होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. लग्नाआधीच दिया प्रेग्नेंट असल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका व्यक्तीने दियाला तिने लग्नाआधीच ती आई होणार असल्याचं का सांगितलं नाही असा सवाल केला आहे. ” ही खुप चांगली गोष्ट आहे तुझं अभिनंदन ,मात्र लग्नामध्ये एका महिला पुजाऱीकडून तू लग्नाचे विधी करून रुढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला तर मग लग्नाआधी आई होणार असल्याची घोषणा का केली नाही?” असा प्रश्न युजरने सोशल मीडियावरून दियाला विचारला.

(photo- instagram@diamirza)

युजरच्या या प्रश्नावर दिया मिर्झाने त्याला उत्तर दिलं आहे. ” चांगला प्रश्न आहे. पण आम्हाला बाळ होणार म्हणून आम्ही लग्न केलेलं नाही तर आम्ही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी लग्न केलं आहे. जेव्हा आम्ही लग्नाची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला बाळ होणार आहे. त्यामुळे आम्ही हे लग्न प्रेग्नेंसीमुळे केलेलं नाही. वैद्यकीयदृष्ट्या सर्व सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी आम्ही आधी घोषणा केली नाही. माझ्या आयुष्यातील हे सर्वात सुंदर क्षण आहे. अनेक वर्षांपासून मी या क्षणाची वाट पाहत होते. वैद्यकीय कारणांमुळे मी ही आनंदाची गोष्ट लपवून ठेवली इतर काही कारण नाही.” असं उत्तर दियाने दिलं आहे.

या शिवाय दिया मिर्झाने ही बातमी सोशल मीडियावरून सांगण्याचं कारण स्पष्ट केलंय. ” याचं उत्तर देतेय कारण, 1.बाळ होणं ही आयुष्यातील सर्वात सुंदर देणगी आहे. 2. या सुंदर प्रवासात लाज बाळगण्यासारखं काही नाही. 3. स्त्री म्हणून आपण नेहमी आपल्या आवडीला प्राधान्य द्यायला हवं. अविवाहित राहून आई होणं किंवा लग्नकरून ही आपली निवड आहे. 4.एक समाज म्हणून आपण काय चूक किंवा बरोबर आहे याचा विचार करण्यापेक्षा योग्य आणि अयोग्य याची कल्पना रुजवली पाहिजे.” असं ती म्हणाली.
\

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

1 एप्रिलाला दियाने सोशल मीडियावरून ती आई होणार असल्याची बातमी दिली होती. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणाली होती. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 10:25 am

Web Title: dia mirza replied to troll who questioned timing of her pregnancy clarifies she didnt marry because she was pregnant kpw 89
Next Stories
1 करीनाच्या धाकट्या मुलाचा फोटो रणधीर कपूर यांनी केला शेअर?
2 असं मिळेल करोनावर नियंत्रण; राखी सावंतने सांगितला उपाय!
3 अब्रुनुकसानी प्रकरणी कंगनाला दिलासा नाहीच
Just Now!
X