News Flash

दिया मिर्झाने सावत्र मुलीसोबत केला डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

दियाच्या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

दियाची तिच्या सावत्र मुलीसोबत चांगली मैत्री आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिया चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता दियाने पती वैभव रेखीची मुलगी समायरासोबत एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिया आणि समायरा यांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. या दोघी जस्टिन वेलिंगटनच्या ‘माय बेस्टी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी समायरा खाली पडते आणि त्यानंतर त्या दोघी हसताना दिसत आहेत. दियाची तिच्या सावत्र मुलीसोबत चांगली मैत्री असल्याचे दिसते.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

काही दिवसांपूर्वी दियाने एक पोस्ट शेअर करत तिने १४ मे रोजी बाळाला जन्म दिल्याचे सांगितले होते. बाळाला वेळे आधीच जन्म दिल्यामुळे बाळ आयसीयूमध्ये असल्याचं तिने सांगितले होते.

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

दिया आणि वैभय यांनी या वर्षी फेब्रुवारीत लग्न केले. त्या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांच्या या लग्नात वैभयची मुलगी समायराने हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 2:31 pm

Web Title: dia mirza shared a video with her step daughter dancing on justin wellington dcp 98
Next Stories
1 लग्नाच्या एक महिन्यातच अभिनेत्याच्या नात्यात पडली फूट? पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
2 ‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल
3 ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Just Now!
X