ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली. त्यानंतर रियाची चौकशी करण्यात आली. दरम्यान काही कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला तर काहींनी तिच्यावर टीका केली. आता अभिनेत्री अथिया शेट्टीची पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टद्वारे अथियाने रियाला सुनावले असल्याचे म्हटले जात आहे.

अथियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘तुमच्यामुळे एखाद्याचे किती नुकसान झाले हे तुम्हाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्यासोबत घडत नाही’ या आशयाची पोस्ट अथियाने केली आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये रियाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे या पोस्टद्वारे अथियाने अप्रत्यक्षपणे रियाला सुनावले असल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी रियाला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. त्यानंतर रियाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमधील २५ बड्या कलाकारांची नावे घेतली. त्यामध्ये सारा अली खान, रकुलप्रीत सिंह, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा, दिग्दर्शक मुकेश छाब्रा आणि सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यरचा समावेश आहे.