News Flash

‘माल है क्या?’ असे विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका?

हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप २०१७मध्ये तयार करणात आला असल्याचे म्हटले जाते.

अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर आले असून चौकशीसाठी एनसीबीने तिला समन्स बजावले. त्यानंतर दीपिका पती रणवीर सिंहसोबत गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाली. दरम्यान ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये माल है क्या असे म्हणत ड्रग्जची मागणी करण्यात आली होती त्या ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका असल्याचे ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप २०१७मध्ये तयार करणात आला होता. या ग्रुपची अ‍ॅडमीन दीपिका असून जया शाह आणि करिश्मा प्रकाश देखील त्या ग्रूपमध्ये होत्या असे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या ग्रुपद्वारे दीपिका आणि करिश्मा ड्रग्ज विषयी बोलत असल्याचे म्हटले आहे.

उद्या २६ सप्टेंबर रोजी दीपिकाची अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी होणार आहे. या चौकशीपूर्वीच अभिनेता रणवीर सिंहने चौकशीदरम्यान दीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी एनसीबीकडे विनंती केली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रणवीर सिंहने कोणतीही लिखित किंवा शाब्दीक विनंती केलेली नाही असे अमली पदार्थ विरोधी विभाग म्हणजेच NCB ने स्पष्ट केले आहे.

रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी सुरु होती. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 5:26 pm

Web Title: did deepika padukone was the admin of the drug chat group avb 95
Next Stories
1 ‘दोन दिवसात घरी परत येईन’, बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल
2 CSKने वाहिली बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
3 ‘आज ते सगळं आठवतंय”; लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
Just Now!
X